चित्रकला कार्यशाळेत 350 विद्यार्थ्यांचा सहभाग

0

आकुर्डीतील श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयात आयोजन

पिंपरी-चिंचवड : चित्रांची प्रमाणबद्धता, रंगसंगती, रंगांच्या विविध छटा, स्टील लाईफ मेमरी, संकल्पचित्र व अक्षर लेखन अशा विविध बाबींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने आकुर्डी येथील श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय, चित्रकला केंद्राच्या वतीने घेण्यात चित्रकला कार्यशाळा व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध विद्यालयांमधील सुमारे 350 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. पालकवर्गाचादेखील चित्रकला कार्यशाळा व प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला.

यांची होती उपस्थिती
या उपक्रमप्रसंगी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव गोविंदराव दाभाडे, संचालिका डॉ. अश्विनी दाभाडे, चित्रकार विशाल चोपडे, विशाल केदारी, वर्षा चराटे, विशाल बोडके, केंद्र संचालक गोविंद घोडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
चित्रकार व चित्रकला शिक्षकांनी चित्रांची प्रमाणबद्धता, रंगसंगती, रंगांच्या विविध छटा, स्टील लाईफ मेमरी, संकल्पचित्र व अक्षर लेखन अशा विविध बाबी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांमधून समजावून सांगितल्या. चित्रकलेतील बारकावे समजून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 350 विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक संगीता गुरव यांनी केले. तर आभार गणेश भाने यांनी व्यक्त केले.