जळगाव । लायन्सक्लब ऑफ जळगावतर्फे श्रवण विकास मंदिर या कर्णबधिर विद्यालयात गुरुवारी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकला स्पर्धा झाली. तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. चित्रकला स्पर्धा चार गटात घेण्यात आली.
यात पहिली दुसरीच्या गटात कुंदन पाटील प्रथम, तुषार बिर्हाडे द्वितीय, निखिल कोळी तृतीय. तिसरी चौथीच्या गटात भूषण इंगळे प्रथम, तेजस सोनवणे द्वितीय, योगेश महाजन तृतीय, रितेश बाविस्कर उत्तेजनार्थ. पाचवी सहावीच्या गटात मच्छिंद्र धनगर प्रथम, प्रांजल महाले द्वितीय, पल्लवी पोळ तृतीय, प्रसाद सावंत उत्तेजनार्थ. तर सातवीच्या गटात गौरी इंगळे प्रथम, हिरानंद पाटील द्वितीय, सागर टेकावडे तृतीय आले. त्यांना पारितोषिक देण्यात आले. कलाशिक्षक गिरीश बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले.