न्यू पुणे स्कूलच्यावतीने स्पर्धेचे आयोजन
निगडी : येथील न्यू पुणे पब्लिक स्कूलच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटात आघना वाइंगडे तर मोठ्या गटात रितिष्मा छामेडिया यांनी प्रथम क्रमांक पटाकवला. यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमास रिलायन्स एज्युकेशनचे प्रमुख विष्णू साळुंखे, चित्रकार सुनील होले, सचिव प्रदीप खंदारे, ड अमृता खंदारे, प्राचार्य लतीफ मणेर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते. होले यांनी विद्यार्थ्यांसमोर आपली कला सादर केली.
3 ते 6 या वयोगटात प्रथम अघना वाइंगडे, द्वितीय रिया माहेश्वरी व तृतीय क्रमांक नैनिका करोला यांनी पटकाविला. या विजेत्यांना अनुक्रमे इलेक्ट्रिकल मोटरसायकल, स्कूटर सायकल, टिफीन बॉक्स, कलर व पेन्सिल बॉक्स बक्षिसे देण्यात आले. तर 7 ते 10 वयोगटातील प्रथम रितिष्मा छामेडिया, द्वितीय स्नेहा जैन, तृतीय सम्राट पाटील यांनी पटकाविला. अनुक्रमे मिनी टॅब, सायकल, स्कूल बॅग, टिफीन बॉक्स बक्षिसे देण्यात आले.सहभागाबद्दल सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले.