वसुंधरा फाऊंडेशन या संस्थेमार्फत रंभाई आर्ट गॅलरीत होणार चित्र प्रदर्शन
चाळीसगाव – आपल्या कुंचल्यातून चाळीसगाव परिसरातील धार्मिक ऐतिहासिक नैसर्गिक व औद्योगिक स्थळांचे व शहरातील काही नामवंत व्यक्तींचे चित्रे चाळीसगाव शहरातील प्रसिद्ध चित्रकार व कला शिक्षक धर्मराज खैरनार यांनी रेखाटली असून या संपूर्ण चित्रांचे प्रदर्शन चाळीसगाव शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वसुंधरा फाऊंडेशन या संस्थेमार्फत भडगावरोड स्थित रंभाई आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले असून १३ ते १६ जानेवारी दरम्यान हे चित्रप्रदर्शन होणार आहे. चित्रकार धर्मराज खैरनार यांची चित्रे अत्यंत मनमोहक पहिल्याच दृष्टिक्षेपात नजरेत भरणारी असल्याने त्यांच्या चित्रांना नेहमीत रसिकांची पसंती मिळालेले आहे तसेच त्यांचे निसर्गचित्र तसेच शहरातील विविध मंदिरे गडकिल्ले त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे चित्र मोठ्या प्रमाणावर आवडीचा आणि कौतुकाचा विषय झालेला आहे याचमुळे या शांता चित्रप्रदर्शनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असे दिसून येत आहे.
चित्र प्रदर्शनाचे उदघाटन
आमदार उन्मेष पाटील, राजीव देशमुख माजी आमदार, डॉ.उज्वला देवरे, प्रसिद्ध चित्रकार म.सो.बाविस्कर, ॲड.मोहन शुक्ला, किसनराव जोर्वेकर, मोतीलाल आहिरे, देवीदास खैरनार, वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्षा धरती पवार यांच्याहस्ते होणार आहे. या चित्र प्रदर्शनास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन चित्रकार धर्मराज खैरनार व वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.