माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे गौरवोद्गार
चाळीसगाव वसुंधरा फाऊंडेशनतर्फे कलाशिक्षक चित्रप्रदर्शनाचे आयोजन
चाळीसगाव – शहरातील वसुंधरा फाउंडेशन आयोजित कलाशिक्षक तथा चित्रकार धर्मराज खैरनार यांच्या चित्रप्रदर्शनास रविवार सुरुवात झाली असून या औचित्यपर माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी चित्रप्रदर्शनास भेट देत पाहणी केली. सर्वांसाठी हे चित्रप्रदर्शन १६ जानेवारीपर्यंत सुरु राहणार असून धर्मराज खैरनार यांनी आपल्या कुंचल्यातून चाळीसगाव परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळांसोबत व्यक्तीचित्रे रेखाटली आहेत त्यांनी रेखाटलेली चित्रे ही दृष्टिक्षेपात भर टाकणारी राहिली आहेत.
धर्मराज खैरनार यांनी साकारलेली चित्रे ही मनास सुखावणारे असून एका अनोख्या कलाप्रदर्शनात स्वतःला हरवून गेल्यासारखे वाटतेय, अप्रतिम अशी रंग अनुभूती, लयदार रेषा आणि रंगाची छटा चित्रातील सौंदर्यात भर टाकणारी आहेत. कलाशिक्षकाच्या माध्यमातून आत्मानंदाची अनुभूती अन् त्यांची सृजनात्मक वाटचाल गौरवास्पद आहे, असे गौरवोद्गार राजीवदादा देशमुख यांनी काढले.
प्रसंगी यांनी दिली भेट
याप्रसंगी जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष भगवान पाटील, नगरसेवक दिपक पाटील, डॉ.प्रमोद सोनवणे, पं.स.अजय पाटील, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा धरती पवार, सचिन पवार, रविराज परदेशी, देवेन पाटील, गजानन मोरे, कलाशिक्षक मनोज पाटील, मिलिंद शेलार, प्रताप भोसले, स्वप्नील कोतकर, भैय्यासाहेब महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.