चित्रकार चव्हाण यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

0

चाळीसगाव । येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना औरंगाबाद येथील झेप साहित्य प्रकाशनाचा राजयस्थरिय कला क्षेत्रासाठी दिला जाणारा मातोश्री हरनाताई जाधव स्मृती राज्य सन्मान पुरस्कार यावर्षी दिनेश चव्हाण यांना जाहीर झाला. तशी निवड पत्रकार संपादक डी.एन. जाधव यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत जाहीर केली. चव्हाण सर यांचे कला क्षेत्रात योगदान खूप मोठे आहे. कथा, कविता, लेख, व्यंगचित्र, कथाचित्र, चित्रमालिका, पोट्रेट, यशस्वी व्यक्तीची रेखाटन, सिम्बॉल, मुखपृष्ठ, नेचर ड्रॉईंग, यात विशेष हातखंडा आहे. कला साहित्य कहेत्रात त्यांना या अगोदरही अनेक सन्मान, पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा भव्य पुरस्कार त्यांना जाफराबाद, (जालना) येथे जानेवारीत होणार्‍या साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे.