चित्रपटांची शुटींग सुरु होणार ; ही असणार अट

0

नवी दिल्ली:  गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरण पूर्णत: बंद आहे. मात्र आता अनलॉकमध्ये हळूहळू अनेक क्षेत्रांना पुन्हा सुरुवात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता अनलॉक ३ सुरु असून त्यात चित्रपट गृहे सुरु झाली आहे. मात्र अद्याप चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली नव्हती, दरम्यान आता चित्रपट आणि टीव्ही मालीकांच्या चित्रीकरणालाही परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शुटींगसाठी मानक प्रक्रिया जाहीर करत असल्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

चित्रिकरणाची सुरुवात करताना काही अटी-शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करून शुटींग करता येणार आहे. सोशल डीस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करूनच चित्रीकरण करता येणार आहे. मात्र जे कलाकार कॅमेऱ्यासमोर आहेत, त्यांना मास्क न वापरण्याची परवानगी आहे.