चित्रपटात जरी राणी नाही भेटली तरी खऱ्या आयुष्यात क्विन मिळाली- रणवीर सिंग

0

मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन अलीकडेच लग्नबेडित अडकले. नुकतेच या दोघांनीही स्टार स्क्रिन अवार्डमध्ये हजेरी लावली होती. या अवार्ड फंक्शनमध्ये रणवीरला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

रणवीर सिंगला ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘खिल्जी’च्या पात्रासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना रणवीर भावूक झालेला दिसला. तो म्हणाला, की ‘चित्रपटात जरी मला राणी भेटली नाही. तरी, खऱ्या आयुष्यात क्विन मिळाली आहे’. दीपिकादेखील यावेळी भावूक झालेली दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.