चित्रपटावर आक्षेप घेता मग पुस्तकावर का नाही ?- अनुपम खेर

0

मुंबई : ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चा ट्रेलर नुकताच रिलीझ झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून काँग्रेसबद्दल चांगलीच चर्चा सुरु आहे. मात्र, या चित्रपटात दाखवलेल्या घडामोडी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे सांगत यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दाखवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असं सांगितले आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेता अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया देताना एक सवाल उपस्थित केला आहे. ज्या पुस्तकावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. ते चार वर्षांपूर्वी प्रकाशित झाले त्यावेळी कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही, मग आत्ताच का घेतला जातोय. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यावर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी याचे स्वागत करायला हवे. कारण, यात असेही डायलॉग आहेत जे मनमोहन सिंग यांचं महानत्व सिद्ध करतात. असे त्यांनी म्हटले आहे, असेही बोलले.

हा चित्रपट ११ जानेवारीला रिलीझ होणार आहे.