नवी मुंबई : अपघातात अपंगत्व येऊनसुद्धा खचून न जाता जीवनाशी नेहमी संघर्ष करणार्या राहुल सिद्धार्थ साळवे यांच्या चेहर्यावर आजही तोच उत्साह तसेच तेज पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जीवनाशी लढण्याचा राहुलचा संघर्ष हा त्याच्या मित्रांसाठी नेहमी प्रेरणादायी ठरत आहे.
वाशी सेक्टर 15 येथील अष्टभुजा सोसायटीमध्ये राहणारा मध्यमवर्गीय कुटुंबातील राहुल साळवे हा 33 वर्षांचा तरुण इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आपले डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करून उरण येथील मारुती सुझुकी ऑटोमोटिव्ह या खासगी कंपनीत 7 वर्षांपूर्वी कामाला लागला होता. जानेवारी 2010 साली ट्रेनिंगसाठी गेलेल्या राहुलचा मुंबईच्या पार्ले इंटरनॅशनल हॉटेलमधून ट्रेनिंगवरून घरी येत असताना दुचाकीवरून दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात राहुलला आपला एक पाय गमवावा लागला असून, त्याला कमरेखाली कायमचे अपंगत्व आले. अपघातात अपंगत्व आल्याने खचून न जाता जीवनाशी राहुलचा संघर्ष नेहमी सुरूच राहिला. शाळेत असल्यापासून राहुलला नाटक व कला क्षेत्रात मोठा रस होता. कविता, लेख, सिनेमासाठी गाणी लिहिणे, पुस्तक वाचणे हा राहुलचा छंद. अपघातानंतर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना 2011 साली राहुलने पहिल्यांदाच आई तुझ्यासाठी हे पाहिलं गाणं लिहिले.27 नोव्हेबर 2015 साली प्रकाशित झालेल्या शिनमा या मराठी चित्रपटासाठी राहुलने लिहिलेले कल्ला झाला हे मराठी गाणं हिट झालं तसेच षळश्रा रपव ींशश्रर्शींळीळेप ळपीींर्ळीीींंश ेष ळपवळरमध्ये वेर्लीाशपीीूं फिल्मसाठी एक हिंदी गाणंसुद्धा राहुलने लिहिले आहे तसेच राहुलने आतापर्यंत 10 गाणी, 150 कविता, 30 लेख, 2 काव्यसंग्रह लिहिले आहेत. राहुलने लिहिलेला ती विरह मी हा काव्यसंग्रह 2013 साली आणि रंग गहिरे हा काव्यसंग्रह 2014 साली प्रकाशित झाला आहे. नाटकक्षेत्रात कार्यरत असलेले शाळेतील शिक्षक रामेश्वर साळुंखे यांच्याकडून राहुलला मोलाचे मार्गदर्शन लाभले. राहुलने मित्रांच्या साथीने मैत्री एक सेवाभावी नात ही संस्था 2013 साली स्थापन केली असून, ही संस्था सामाजिक क्षेत्रात नेहमी कार्यरत असते. तसेच हशश्रळिपस हरपवी षेी र लश्रेेव र्सीेीि हा ग्रुप 2014 साली स्थापन करून या ग्रुपच्या माध्यमातून राहुलने आजपर्यंत महाराष्ट्रातील 450 रुग्णांना रक्ताच्या बाटल्यांचा पुरवठा केला आहे. प्रियांका चोप्रा र्िीेीर्वीलींळेप च्या, आगामी, काय रे रास्कला या मराठी चित्रपटासाठी, दयासागर वानखेडे दिग्दर्शित आगामी, ’कॉपी’ आणी ’भारत आमचाही देश आहे’ या दोन चित्रपटासाठी आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर आधारित, विराग मधुमालती दिग्दर्शित, ’डॉ.तात्या लहाने…अंगार’ या आगामी मराठी चित्रपटासाठी राहुलने गीतलेखन केले आहे. सध्या राहुल युवा पॉवर या मासिकासाठी स्तंभलेख लिहितो. तसेच या नाटकाचा निर्माता म्हणून काम पाहतो आहे. यासाठी राहुलला आई, वडील, लहान भाऊ तसेच मित्राची मोठी साथ मिळत आहे.