बालसाहित्यातील महत्वाची नावं घेतांना त्यात लेखिका -कवयित्री – लीला शिंदे यांचे नाव अग्रक्रमाने येत असते, गमती जमती या त्यांच्या नव्या कविता संग्रहाचा परिचय करून देतांना त्यांच्या प्रकाशित साहित्याबद्दल नव्याने काय सांगावे..,? लेखिका – कवयित्री -लीला शिंदे आणि त्यांचे बाल-साहित्य सर्वपरिचित आहे., तरी पण ..त्यांच्या काही पुरस्कार प्राप्त साहित्याचा उल्लेख जरूर केले पाहिजे ..तो असा –
1. चार गोष्टी आवडीच्या – राज्य पुरस्कार, 2.पंख येती पक्षाला – राज्य पुरस्कार, 3- या मुलांनो या – बा.कु.सा .पुरस्कार, 4- अभ्यास झाला सोपा- प्रदूषण मंडल आणि इको फोक्स या संस्थांचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार. वरील उल्लेख यासाठी केलेत की ..लीला शिंदे यांचे बालसाहित्य लेखन हे विविध स्वरूपाचे असून ते सातत्याने पुस्तक रूपाने येत असते. प्रस्तुतचा ‘गमती जमती’ हा कविता संग्रह तसा छोटासाच आहे..पण या संग्रहाची साईझ. नेहमी पेक्षा मोठी आहे.रंगीत पानावरती, मोठ्ठी रंगीत चित्र ..आणि त्या सोबत छानशी कविता ..ज्या अर्थातच गमती-जमतीच्या आहेत. पहिलीच कविता – लबाड कोल्होबा .. ( पृ.4 ),
या कवितीत वाघोबादादा सोबत लबाडी करणार्या कोल्होबाची लबाडी कशी उघडी पडते याची गोष्ट खूप छान सांगितली आहे.
कविता दुसरी – नाजूक नि सुंदर अशा फुलपाखरू ची.
फुलपाखरा रे फुलपाखरा
पंख चिमुकले मऊ मुलायम
रंगीबेरंगी नक्षी नयनरम्य
वार्यांसंगे भिरभिरती
अलगद नाजूक फुलावरती
कित्ती रे तुझी फुलांवर प्रीती …..(पृ.5 ),
कवितेतील ओळी आणि त्याला असलेले अनुरूप असे चित्र ..यामुळे कविता कशी छान चित्रमय होते .याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा गमती जमती हा कविता संग्रह आहे.
माकडोबा – या छोट्या कवितेत माक्डोबाची उडालेली घाबरगुंडी वाचून बाल मित्र खुदकन हसतील ..
घाबरला साप पळाला, सळ.. सळ..सळ..
माकडोबा हसले, खळ.. खळ..खळ… ( पृ..12 ),
हळू वारा, जोराचा वारा, सुसाट वारा.. हे आपण नेहमीच पहातो.. पण, वारा कवितेत वारा भेटला कि तो कविताच होतो…ही कमाल कवयित्री लीला शिंदे यांची आहे..
आला वारा वारा आला, भुर्र भुर्र…भुर्र ..
आता इथं, गेला कुठं, दूर .. दूर .. दूर … (पृ.18 ),
चित्रविचित्र – या कवितेत असे प्राणी भेटतात.. ही एक निराळीच गम्मत वाटेल.. कारण.. यात, बिनसोंडेचा हत्ती, हरणाचं तोंड असलेला पट्टेरी वाघ, आणि खट्याळ माक्डोबाला चक्क हत्तीचे पाय आहेत.. सगळीच कविता म्हणजे एक धमाल आहे ..जरूर वाचा..( पृ.21),
तुमच्या-आमच्या, सर्वांच्या आवडीच्या पावसावर एक मस्त कविता.. या पावसला सारी मुले काय म्हणत आहेत बघा तरी …, पावसा पावसा रोज ये
मोठ्ठं तळ साचू दे, चिक चिक चिखल होऊ दे
मस्त मनसोक्त खेळू दे ….(पृ.24 ),
असा पाउस दोस्त म्हणून खूपच आवडेल, नाही का?
अशा गमती-जमतीच्या अजून छान छान कविता आणि सोबतची सुरेख बहारदार रंगीत चित्र यात आहेत..
काही कविता शीर्षक तर पाहा..
चांदोबा (पृ.6), साखरझोप (8),कोण बरे रंगवितो (पृ.13), सुंदरमेळ(15), खूप खूप मज्जा (22), डोंगर (28), चित्रखेळ आणि इतरही कविता या संग्रहात आहेत. गमती जमती – कविता संग्रह आकर्षक आणि देखणा आहे, बालमित्र हा संग्रह पाहताक्षणी तो हातात घेतील हे नक्की. लेखिका – कवयित्री लीला शिंदे यांच्या लेखनाचा हा एक सुंदर असा अविष्कार आहे असे म्हणू या त्यांना लेखन शुभेच्छा. चित्रकार – पुंडलिक वझे यांनी कविता आणि रंगीत चित्र खूपच सुंदर केली आहेत.त्यांचे अभिनंदन. प्रकाशक – माधुरी रमेश राऊत यांनी साक्षात प्रकाशनाकडून बालमित्रांना एक सुरेख कविता संग्रह भेट दिला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
-अरुण वि.देशपांडे
जनशक्ति, पुणे
9850177342