पुणे । मराठीतील आगळ्यावेगळ्या ‘दर्या’ या चित्ररूपी कादंबरीचा प्रकाशन सोहळा 16 डिसेंबरला सायं. 6 वा. टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न होणार आहे. अभिनेते अमेय वाघ व मिथिला पालकर या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन करणार असल्याची अशी माहिती विक्रम पटवर्धन यांनी दिली.
आशय क्लबतर्फे प्रथमच चित्ररूपी कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. या चित्ररूपी कादंबरीत 130 पानांची कथा व 50हून अधिक सुंदर चित्रांसह स्पष्टीकरणे आहेत. पुस्तकरूपी मिथक करण्याचा प्रयत्न या पाच पात्री कादंबरीत केला गेला आहे. सुमारे 54 प्रकरणे असलेली ‘दर्या’ कादंबरी तरुण लेखक विक्रम पटवर्धन यांनी लिहिली आहे. या कादंबरीतील चित्रे आमीर पठाण यांनी रेखाटली आहेत.कार्यक्रमाच्या दिवशी येणार्या पाच भाग्यवान प्रेक्षकांना कादंबरी लेखकाच्या स्वाक्षरीनिशी भेट देण्यात येईल.