जळगाव: येथील पु.न.गाडगीळ या दागिन्याच्या भव्य शोरूममध्ये रेखाटलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन सुरु आहे. ‘चित्रांगण’ यानावाने हे चित्रप्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनाला प्रेक्षक आणि कालाप्रेमिंचे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. १५ ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन सुरु होते, मात्र प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. चित्रप्रदर्शनात ठेवण्यात आलेले चित्रांचे रेखाटन कादंबरी चौधरी हिने केले आहे. कादंबरी ही एम.सी.ए.च्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. शिक्षणासोबतच तिने आपले कलागुण जोपासले आहे.
जिल्ह्याभरतील कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देऊन कलाकाराचे कौतुक केले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत कलाप्रदर्शन असल्याने प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.