चित्रांमधून उलगडला ‘डिजिटल’ भारत

0

हडपसर । वडकी येथील श्री विघ्नेश्वरा एज्युकेशन सोसायटी संचलित इंटरनॅशनल स्कुल ऑफ मॅनजेमेंट अँड रिसर्च या महाविद्यालयात डिजिटल इंडिया या विषयावर पोस्टर तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चित्रांच्या माध्यमातून मुलांनी डिजिटल इंडिया या महत्वाच्या विषयावर आपले विचार मांडले.

देश डिजिटल करण्याचा निश्‍चय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामध्ये आपणही या माध्यमातून सामील व्हावे, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुलांनी त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर भारत देश कसा डिजिटली साक्षर होऊ शकतो हे चित्रांमधून मांडले. ग्रीन इंडिया डिजिटल इंडिया हा झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, असा निश्चय यावेळेस विद्यार्थ्यांनी केला.

13 टीमचा सहभाग
महाविद्यालयाच्या 13 वेगवेळ्या टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निलेश भुतडा आणि संचालक मेजर.जनरल (नि) अमर कृष्णा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विश्वजित सिन्हा, स्वाती गौरकर, अमित श्रीवास्तव हे विद्यार्थी विजेते झाले. तर कौशिक चॅटर्जी, मोनिका लगड, पॅबित्रकुमार साहू हे विदयार्थी या स्पर्धेत उपविजेते ठरले. स्पर्धेचे आयोजन प्राध्यापिका शिनम गोगिया आणि डॉ. प्रतिमा सनध्या यांनी केले.