पाचोरा– तालुक्यातील भोजे येथील रेशन दुकांनदाराविरुद्ध खोट्या तक्रारी करणे, शिवीगाळ करणे, ब्लॅकमेल करणे, बदनामी करणे, शासकीय कार्यालयात खोटे मेल पाठवणे, अधिकाऱ्यांना व्हाॅटसअप नंबरवर कारवाईचे मेसेज पाठवणे, लॉकडाऊन काळात गर्दी जमवणे, समुहास चिथावणी देणे या कारणावरून निलेश नामदेव उबाळे याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.