नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अंतिम जामीन याचिकेला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केला आहे.
सक्तवसुली संचालनालयाने आज न्यायालयात आपले म्हणणे मांडले. पी. चिदंबरम यांना जामीन दिल्यास एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे असे ईडीने सांगितले.
एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी पी.चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याबाबत विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी आरोपपत्रावर सुनावणी करण्यासाठी 26 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सुरुवातीला पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तसेच, याप्रकरणात नऊ आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये चिदंबरम, एस. भास्कररन (कार्ती यांचे सीए), व्ही. श्रीनिवासन (एअरसेलचे माजी सीईओ) यांच्याही नावांचा समावेश आहे.