चिनावलच्या वृद्धेच्या ट्रकच्या धडकेत मृत्यू

0

अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक वाहनासह पसार ; सावदा पोलिसात अपघाताची नोंद

चिनावल- गावातील विमलबाई विठाराम नेमाडे (72) ही वृद्ध महिला 24 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाणी भरण्यासाठी जात असताना अज्ञात भरधाव ट्रकने धडक दिल्याने वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. चिनावल गावाच्या बसस्थानक चौकात ही घटना घडली. घटनेनंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला.

जागीच वृद्धेचा मृत्यू
या प्रकरणी विनोद भास्कर नेमाडे (35, चिनावल, ता.रावेर) यांनी फिर्याद दिल्यावरून सावदा पोलिसात नोंद करण्यात आली. गुरुवारी सकाळी नळ आल्यानंतर विमलबाई या नळावर पाणी घेण्यासाठी जात असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली तर त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. तपास उपनिरीक्षक मनोज खडसे करीत आहेत.