रावेर – तालुक्यातील चिनावल येथील 24 वर्षीय विवाहितेचा गावातील एका संशयीत आरोपीने विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रविवारी संशयीत आरोपी विकास उर्फ विक्की सागर तायडे (चिनावल) विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अशोक साळुंखे करीत आहे.