सावदा : गेल्या 20 दिवसांपासून चिनावलाह कुंभारखेडा, सावखेडा परीसरात शेतकर्यांच्या शेतातील केळी घड, पीक चोरी व नुकसानीचे सत्र थांबायला तयार नाही. मंगळवार, 8 रोजी रात्री चिनावल व वडगाव शिवारातून चोरट्यांनी चार शेतकर्यांच्या विहिरीतील इलेक्ट्रीक पंपावर स्टार्टरचे कट आऊट तसेच केबल वायरची चोरी केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
वाढत्या चोर्यांमुळे शेतकरी संतप्त
चिनावल शिवारातील हेमांगी कोल्हे यांच्या मालकिचे शेत चिनावल येथील गिरीश घनश्याम पाटील यांनी कसण्यासाठी घेतले आहे तसेच लगतच्या नीळकंठ मधुकर गारसे यांच्या शेतातील विहिरीवरील कॉपर वायरची केबल वायर तसेच वडगाव शिवारातील उटखेडा रस्त्यावर श्रीकांत सीताराम सरोदे व गोपाळ लक्ष्मण नेमाडे यांचे शेत असून शेतातील केबल वायर चोरट्यांनी लांबवली आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव
वडगाव सहकारी पीक संरक्षण संस्थेमार्फत तक्रार देण्यात आला आहे तर निंभोरा सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रा.का.पाटील व विकास कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शेतकरी श्रीकांत सरोदे, गोपाळ नेमाडे, ठकसेन पाटील, पोलिस पाटील संजय वाघोदे, चिनावल पोलिस पाटील निलेश नेमाडे, वडगाव पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन गोपाळ पाटील उपस्थित होते.