चिनावल परीसरातील चोर्‍यांच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको

पोलिस प्रशासनाचे दोषींवर कारवाईचे आश्‍वासन : सावदा सहा.निरीक्षकांच्या बदलीची मागणी

सावदा : पोलिसांनी आश्‍वस्त करूनदेखील चिनावल येथील शिवारातील चोर्‍या सुरूच असून रविवारी पहाटे दोन शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे ठिबक संच जाळण्यात आले तसेच एका शेतकर्‍यांचे 40 ते 50 केळी घड कापून नुकसान करून टाकण्याचा प्रकार समोर आल्याने परीसरातील शेतकर्‍यांनी संताप व्यक्त करीत सावदा शहरातील बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर सुमारे दोन तास‘ रास्ता रोको’ आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तत्काळ प्रभारी अधिकारी यांची बदली करून दोषींवर चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात यावी व जोपर्यंत पोलिस अधीक्षक येथे येणार नाही तोपर्यंत आंदोलन ठिकाणावरून उठणार नाही असा पवित्रा पवित्रा घेतल्याने अपर पोलिस अधीधक्षक चंद्रकांत गवळी यांनी आंदोलनकर्त्यांची समज काढली. तसेच तत्काळ दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वाढत्या चोर्‍यांमुळे संताप
चिनावल, सावदा, रोझोदा, कोचुर, खिरोदा, वाघोदा, मस्कावद परीसरात गेल्या आठ दिवसांपासून गुरे पालकांकडून तसेच केळी व अन्य भाजीपाला रेल्वेद्वारे चोरट्या मार्गाने वाहून येणार्‍या लोकांच्या टोळ्यांकडून सर्रासपणे पीक चोरी करण्याचे प्रकार सुरू आहेत तर शेतकर्‍याने हटकल्यास शेतकर्‍यांना मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकरी अगदी त्रस्त झाले आहेत. वारंवार पोलिस प्रशासनाला कळवूनही हे प्रकार बंद होत नसल्याने व गावात पोलिस प्रशासनाचा खडा पहारा असूनही रविवारी पहाटे चिनावल येथे नुकसानीचा प्रकार घडल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले.

पोलिस अधिकार्‍यांची उडाली धावपळ
पोलिस अधीक्षक आल्याशिवाय आपण कुणाशीही चर्चा करणार नसल्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला तसेच महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज आणि स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष भक्तीकिशोरदास शास्त्री आमदार शिरीष चौधरी, खासदार रक्षा खडसे यांच्यासमोर अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सहाय्यक निरीक्षकांची बदली हवी
आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी वरीष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आल्याशिवाय व आजवर ही चोरी संदर्भात दिलेल्या तक्रारी यातील गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्यासह सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगोले यांची तत्काळ बदली करावी आदी मागण्या लावून धरल्या. प्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांनाही शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले तर खासदार रक्षा खडसे यांनी मी स्वतः पोलिस प्रशासनाला सूचना देवून ही यात सुधारणा होत नसल्याने मी एक शेतकरी म्हणून आंदोलन करीत असल्याचे सांगत शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर शेतकरी म्हणून उपस्थित असल्याचे यावेळी नमूद करून केले. भुसावळ डीआरएम यांना रेल्वेद्वारे पीक चोरी करणार्‍या टोळीविरोधात स्पेशल फोर्स नेमण्याची सूचना केली.

तातडीने कारवाईचे आश्‍वासन
आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना अपर पोलिीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व डी.आर.एम.केडीया यांनी मागण्या रास्त असल्याचे सांगत योग्य उपाययोजना आखल्या जातील, तुम्ही प्रशासनास सहकार्य करा असे यावेळी आवाहन केले.

तो पर्यंत लढा सुरूच राहणार : महामंडलेश्‍वर
या आधी अध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून मी शेतकर्‍यांना व शेतकर्‍यांच्या शेतमालाला सुरक्षा मिळावी व याला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी उपस्थित आहे. शेतकर्‍यांना सुरक्षितता जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत लढा सुरू ठेवा असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज (फैजपूर) यांनी केले. स्वामी भक्तीदासज शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी उपस्थित होते.

अधिकार्‍यांची धाव
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे, यावल पोलिस निरीक्षक एस.बी.पाटील, फैजपूर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, निंभोर्‍याचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सावद्याचे सहा.निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, राजेंद्र पवार यांच्यासह मोठा फौज फाटा सावदा येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला. रस्ता रोकोला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून पाठिंबा देण्यात आला. यात अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, कृषी उत्पन्न रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोपाळ नेमाडे, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, चिनावल येथील पंकज नारखेडे, अक्षय पाटील, सागर भारंबे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोरोले, श्रीकांत सरोदे, मनीष बोरोले, अमोल महाजन, कैलास भंगाळे, बंसी गारसे, तुषार महाजन, प्रवीण महाजन, प्रमोद पाटील, संदीप महाजन, दिनेश महाजन, भास्कर भिरूड, चंद्रकांत गारसे, अमोल महाजन, अतुल धांडे, पांडुरंग पाटील, योगेश भंगाळे, भास्कर सरोदे, रोझोदा येथून चिमण धांडे, दीपक धांडे, भरत रमेश महाजन, भूपेश धांडे, मोहन चौधरी, खिरोदा येथून योगेश चौधरी, किशोर चौधरी, कोचुर येथून कमलाकर पाटील, माजी सरपंच रवींद्र महाजन, मोठे वाघोदा येथून राहुल महाजन, हर्षल पाटील, सनी पाटील,गोपाळ सुपे संकेत सुपे, योगेश पाटील, पंकज पाटील, संजय माळी, सावदा येथून यशवंत धांडे, सचिन बर्डे, राजकिरण बेंडाळे, किरण नेमाडे, सागर पाटील, अतुल चौधरी, अतुल नेमाडे, बंटी बडे, शिवाजी भारंबे, हरी परदेशी, मिलिंद पाटील, प्रमोद भंगाळे, प्रल्हाद चौधरी, योगेश महाजन, संतोष पाटील, किरण चौधरी, प्रतीक भिडे, कालिदास ठाकूर, अतुल नेते, अक्षय सरोदे, आकाश घोडके, सागर बेंडाळे, जे.के.भारंबे प्रतीक भारंबे यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.