मुंबई : भारतीय सीमेत सातत्याने घुसखोरी करून भारताला धमकावणार्या चीनी ड्रॅगनला धडा शिकवणे आवश्यक आहे. असे असतांनाही भारत चीनशी व्यापार वाढवत आहे आणि चिनी ङ्गड्रॅगनफ भारताच्या घराघरांत पोहोचवला जात आहे. यासाठी भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. भारत सरकारने चीनशी असलेल्या व्यापारविषयक धोरणावर पुनर्विचार करून आर्थिक नाकेबंदी करावी. त्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांवर बहिष्कार घाला, असे आवाहन करत हिंदु जनजागृती समिती प्रणित महिला शाखा, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी शनिवारी दादर येेथील कबूतरखाना येथे थाळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा आवाज केंद्र शासनापर्यंत पोचण्यासाठी थाळी वाजवत उपस्थित राष्ट्रप्रेमी महिलांनी चीनला धडा शिकवण्याचे आवाहन केले. या आंदोलनात रणरागिणी शाखा, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांसह बहुसंख्येने राष्ट्रप्रेमी महिला उपस्थित होत्या.
मोदींनी स्वदेशीचा नारा द्यावा!
सध्याच्या स्थितीमुळे देशभरात काही राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी ङ्गचिनी उत्पादनांवर बहिष्कार घालाफ या संदर्भात आंदोलने, तसेच ङ्गसोशल मीडियाफ या माध्यमातून मोहिमा चालू केल्या आहेत. याचा शासनाने गंभीरपणे विचार करायला हवा. भारतीय लघुउद्योजकांचे अहित करून चिनी उत्पादकांनी निर्माण केलेल्या वस्तू देशात विकण्याविषयीच्या धोरणाची शासन स्तरावर समीक्षा करणे आवश्यक आहे. तसेच यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ङ्गमन की बातफ कार्यक्रमाद्वारे ङ्गविद्यार्थ्यांनी दुकानदारांकडे स्वदेशी उत्पादनांची मागणी करण्याचा आग्रह धरावाफ, असा आवाहनपर संदेशही द्यावा. त्याद्वारे स्वदेशी उत्पादकांना चालना मिळण्यास विशेष प्रयत्न होतील, अशीही मागणी या आंदोलनाच्या वेळी करण्यात आली.