बीजिंग । भारताच्या विकासाला पाहता आणि विकासाची गती पाहता चीनी मीडियाने चीनलाच शांत राहण्याचा सल्ला देत घरचा आहेर दिला आहे. सध्या चीन भारतावर युद्ध करण्याच्या तयारीत आहे. तशा हालचालीही चीनने सुरू केल्या आहेत. त्यामुळे भारतही पूर्ण तयारीनिशी उतरतील. परंतु, यावेळी चिनी मीडियाने शांततेचा मार्ग स्वीकारत आपल्याच देशाला प्रकरण शांततेत घेण्याचा सल्ला देत चीनला घरचा आहेर दिला आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्रात लिहिले आहे की, भारताजवळ मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन येत आहे.
स्वतःला त्रास कशाला?
यामुळे भारतीय अर्थव्यवस्था, रोजगार आणि औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. यामुळे भारताच्या विकासाला पाहून चीनला स्वतःला त्रास करून घेण्याची गरज नाही. लेखात चीनने, भूतकाळात भारताकडे एवढी संपत्ती, कुशल कर्मचारी आणि विकसित निर्माण क्षेत्र नव्हते, असाही उल्लेख केला आहे.
चिनी कंपनीही करत आहेत व्यवसाय
भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. चीन युद्ध परिस्थितीसाठी तयारी करत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. परंतु, यावेळी चीनच्या सरकारी वृत्तपत्रांनी आपल्या लेखातून चीनला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी भारताच्या विकासाबाबत आणि भूतकाळातील परिस्थितीची आठवण आपल्या देशाला करून दिली. यावेळी भारताच्या बाजारपेठेत चीनी कंपनीही व्यावसाय करत असल्याची आठवण करून दिली. चिनी कंपनी भारतात व्यावसाय करत असताना आता भारतात मेक इन इंडिया जोर धरत असून, भारतीयही त्याला साथ देत आहेत. त्यामुळे याप्रकरणी चीनने शांत राहावे, असे सांगत चीनला घरचा अहेर मिळाला आहे.