चिमुकलीचा महिनाभरापूर्वीच झाला होता वाढदिवस साजरा…

0

जळगाव- खेळत असतांना श्राव्या हर्षल जोशी ही 3 वर्षीय चिमुकली दुसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली होती. तीन दिवस खासगी रुग्णालयात तीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपशयी ठरली आहे. उपचार सुरु असतांना 23 रोजी सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास श्राव्या प्राणज्योत मालवली. वाढदिवस साजरा झाल्यानंतर अवघ्या महिनाभरानंतर चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना त्याचा प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

*खेळत असतांना गेला चिमुकलीचा तोल*

शहरातील खंडेराव नगरातील हर्षल जोशी हे पत्नी पूर्वा, मोठी मुलगी शुभ्रा व लहान मुलगी श्राव्या व आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. हर्षल जोशी हे जैन इरिगेशन कंपनीत नोकरीस असून पुर्वा जोशी या देखील महिनाभरपासून नोकरीस लागल्या होत्या. 20 नोव्हेंबर रोजी दोघे जण ड्युटीला गेले असल्याने त्यांची दोघ मुलींसह वरच्या मजल्यावरील भाडेकरुंची मुली असे सर्व चिमुकले वरच्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होती. दुसर्‍या मजल्यावर असलेल्या भाडेकरुंची मुलगी यासह सर्व चिमुकले गॅलरीत खेळत होती. गॅलरीला लोखंडी ग्रील बसविले असून याठिकाणी खेळत असतांना श्राव्या लोखंडी ग्रीलमधून तोल गेला आणि ती जमिनीवर पडली.

*तीन दिवस मृत्यूशी झुंज ठरली अपयशी*

वरच्या मजल्यावरुन चिमुकली पडल्याची समोरच्या महिलेला दिसताच तिने जोरजोरात आरडाओरड केली. ही घटना श्राव्या कुटुंबियांसह शेजारील नागरिकांना कळताच तिला तशाच अवस्थेत शहरातील खासगी रुग्णलयात दाखल केले. तीन दिवस श्राव्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना सोमवारी दुपारी त्या चिमुकलीची प्राणज्योत मालवली. *जोशी कुटुंबियांना मानिसक धक्का* श्राव्याची आई पुर्वा या महिनाभरापुर्वीच नोकरीस लागल्या होत्या. श्राव्याचा गेल्या महिन्यात 25 आ ॅक्टोंबर रोजी वाढदिवस साजरा झाला होता. चिमुकलीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या महिनाभरात तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याने जोशी कुटुंंबियांना मानसिक धक्का बसला आहे.