जळगाव । समतानगरातील आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत खून करत गोणपाटात बांधून फेकून दिल्याचा प्रकार बुधवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला होता. चिमुकलीस मारणारा संशयित आरोपी आनंदा (आदेश बाबा) तात्याराव साळुंखे यांची सुरूवातीला पोलीसांची चौकशी केली होती. त्यानंतर मुलीला मारणारा संशयित आरोपी आदेश बाबा याने आपल्या घरातून काढता पाय घेत पळ काढला. एमआयडीसीचे पोलीस नाईक संदिप पाटील यांना धानोरा येथील नागझिरी शिवारात आदेश बाबा फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. गिरणा काठावर लपून बसलेला संशयित आरोपी आदेश बाबा हा पाणी पिण्यासाठी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास बाहेर आला. आणि धानोरा गावकर्यांच्या मदतीने पो.ना. संदीप पाटील यांनी ताब्यात घेतले असून एमआरडीसी पोलीसाच्रा ताब्रात दिले.
काय आहे प्रकरण?
मयत चिमुकली ही नूतन मराठा विद्यालयात यंदा चौथीच्या वर्गात शिक्षण घेणार होती. मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता ती घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली. तिच्या आईला लक्षात येताच त्यांनी शेजार्यांच्या मदतीने शोध सुरू केला. परिसरातील एका मशिदीतून अनाउन्समेंट करून मुलगी हरवल्याचे सांगण्यात देखील आले होते. आईसह शेजारच्यांनी रात्रभर संपूर्ण परिसर पिंजून काढून तिचा शोध घेण्यात आला. याचदरम्यान रात्री 11 वाजता मुलीच्या आईने आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेश बाबा (वय 60) याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सकाळी 6 वाजेपर्यंत कुटुंबीय, नागरिकांनी मुलीचा शोध घेतला. सकाळी 7 वाजता याच परिसरात राहणारी एक महिलेला घरासमोरील टेकडीवर एका पोत्याजवळ काही कुत्री व डुकरे जमा झालेली त्यांनी पाहिली. कुत्री या पोत्याचे लचके तोडत असल्याचे जवळ जाऊन पाहिले असता पोत्यात एक लहान मूल असल्याचे दिसून आले. हे चित्र पाहून महिलेला यांना धक्का बसला. दरम्यान, रात्री आपल्या परिसरातून मुलगी बेपत्ता झाल्याचे त्यांना माहित होते. पोत्यात मुलीचाच मृतदेह असावा, असा संशय आल्यामुळे त्यांनी थेट मुलीच्या आईला घरी जाऊन माहिती दिली. मुलीची आई व परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटताच हंबरडा फोडला.
नराधमास फाशी देण्याची मागणी
अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे जिल्हाधिकार्रांना निवेदन दिले. धामणवाडा, समतानगर, 9 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिची निर्घृन हत्या करण्यात आली. खूनात हात असणार्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मानव जातीला काळीमा फासणार्या या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी करत खटला जलद गती न्यायालयात व्हावा. या निवेदनावर जितू करोसिया, राजेश ढंडोरे, आनंद गोयर, संजय ढंढोरे, नितीन जावळे, राजेश गोयर, प्रविण जावळे, दिपक धंजे, राहुल चव्हाण, साईल जावळे, प्रथम गोयर, कन्हैय्या करोसिया, विक्की धुसर, पुनमचंद गोयर, किशोर करोसिया, जयंत चव्हाण आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
दुसर्या दिवशीही जिल्हा रूग्णालयात गर्दी
बुधवारीच दुपारी 2.30 वाजता मयत झालेल्या मुलीच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून शव फ्रिजरमध्ये ठेवण्यात आले. घटनेच्या दुसर्या दिवशी जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रचंड गर्दी होती. मयत मुलीचे वडील गुन्ह्यात अमरावती जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असून गुरूवारी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास अमरावतीहून जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर रूग्णावाहिकेद्वारे समतानगरात घरी घेवून जावून चिमुकलीवर दफनविधी करण्यात आले.
संशयित आरोपी म्हणून आनंदा तात्याराव साळुखे यास अटक केली असून त्यांच्याकडून बेसीक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्याच्याकडून सखोल माहिती घेवून चौकशी करण्यात येत आहे.
– दत्तात्रय कराळे, पोलीस अधिक्षक, जळगाव