जळगाव- पाचोरा तालुक्यातील 3 वर्षीय मुलीवर चॉकलेटचे आमिष देवून किशोर उर्फ पिंटू निंबा कोळी या नराधामाने अत्याचार केल्याची घटना 25 रोजी घडली. दरम्यान पिडीत तीन वर्षीय मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून शुक्रवारी सकाळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यासह विविध सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी परिवाराची भेट घेतली. या घटनेबाबत विविध मागण्यांचे निवदेनही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयात पिडीत बालिकेच्या आई तसेच वडीलांची भेट घेवून माहिती जाणून घेतली. तसेच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी परिवारासोबत असल्याचेही महिलांनी सांगितले. याप्रसंगी लोकसंषर्घ मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, शिवसेनेचे शोभा चौधरी, नवीपेठ महिला मंडळ राजीव नायर, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष निला चौधरी, सार्वजनिक ब्राम्हण सभेच्या विजया पांडे, ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे सचिव अनिस शाह, जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, सचिव फरीद खान, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, मानवाधिकार संघटनेचे महेश तायडे, सचिन चौधरी, सतिश शिंपी, मौलाना आझाद फाऊंडेशनचे फिरोज रफिक शेख अध्यक्ष फिरोज रफिक शेख, एस.इमानदार, शेख अख्तर शेख वसीम शेख रहीम, शेख शाहीद शेख फारुक, अखिल भारतीय छावा संघटना अध्यक्ष वंदना पाटील, मंगला बारी, आशाबाई चौधरी, मनियार बिरादरी अध्यक्ष फारुक शेख, कुलजमातीचे अध्यक्ष फारुक कांद्री, सैय्यद चाँद अमीर, साहस फाऊंडेशनच्या सरीता माळी यांची उपस्थिती होती.
निवेदनात अशा आहेत मागण्या
या गुन्हयाचा तपास 30 दिवसांचे आत पूर्ण करुन चार्जशिट दाखल करावे, सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टा चालवावा. आरोपील जामीन मिळू नये, सदर प्रकरणी कोर्टात खटला सुरु असेपर्यंत पिडीतेच्या पालकांना, साक्षीदारांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे, शासनाच्या योजनेतंर्गत पिडीतास, पालकास त्वरीत अर्थसाहाय्य देण्यात यावे, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश असून निवेदनावर 30 ते 40 सामाजिक कार्यकर्ते महिला व पुरूषाच्या स्वाक्षर्या आहेत.