चिमुकले सरसावले स्वच्छ भारत अभियानासाठी

0

किस्टेरिया शाळेची स्वच्छता प्रभात फेरी

निगडी : येथील क्रीस्टेरिया शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्रित जमून स्वच्छता शपथचे वाचन केले. शाळेच्या परिसरात हातात स्वच्छतेबाबत घोषवाक्य लिहिलेले फलक घेऊन पर्यावरण पूरक घोषणांच्या आवाजात प्रभातफेरी काढली. यावेळी पर्यावरण संवर्धन समितीचे कार्यकर्ते व शिक्षक या फेरीत सहभागी झाले होते. मुलांनी स्वच्छतेचे धडे घेतले.

कचरा समस्या सुटेल!
इसिएचे विकास पाटील म्हणाले की, प्रत्येक विदयार्थ्याने आपल्या घरी सुका कचरा व ओला कचरा वेगळा करण्याबाबत आग्रह धरला पाहिजे. त्यामुळे कचरा समस्या चुटकी सरशी सुटेल. पर्यावरण संवर्धन समितीसोबत शहरातील अनेक शाळा स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत आहेत. प्रत्येक शाळा आपल्या सवडीनुसार हे अभियान राबवते आहे. त्यासाठी शहरातील नगरसेवक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व मनपा आरोग्य विभागाचे सहकार्य मिळते आहे.

या कार्यक्रमास नगरसेविका शर्मिला बाबर, सहा. आयुक्त आशादेवी दुर्गाडे, आरोग्य निरीक्षक बापू गायकवाड, इसिए संचालक विश्‍वास जपे, मीनाक्षी मेरूकर, मोनिका शर्मा, अरूणा पाटील-हेरेकर, सुभाष चव्हाण, अनिल दिवाकर, क्रिस्टेरीया शाळा प्रमुख डॉ. पोली के. मुखर्जी, कलावती कल्याणपूर, मनीषा थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय कुमठेकर यांनी केले तर आभार वैष्णवी नलावडे यांनी मानले.