भुसावळ । शहरातील अँजल प्ले ग्रुपचे स्रेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. यामध्ये एकल तसेच समूह नृत्यांमधून कलाविष्कार सादर करीत चिमुकल्यांनी उपस्थितांच्या टाळ्या व कौतुकाची थाप मिळवली़ आयएमए सभागृहात गुरुवार 16 रोजी सायंकाळी नर्सरी व प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, एकल नृत्य, ग्रुप डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यात उत्कृष्ठ कलाविष्कार सादर करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी फॅन्सी ड्रेस स्पर्धाही झाली़ चिमुकल्यांनी खंडेरायासह शेतकरी, म्हाळसा, बहिणाबाईंची भूमिका साकारली़ प्रसंगी सैराट चित्रपटांच्या गाण्यावर चिमुकलेही थिरकल्याने पालकांनी त्यांना दाद देत ठेका धरला़
यांची होती उपस्थिती
महिला महाविद्यालयाच्या प्रा श्वेता नागला यांच्या हस्ते दीपप्रज्वालन झाले़ विविध स्पर्धेतील विजेत्या ठरलेल्या चिमुकल्यांना बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे चेअरमन संजय पाटील यांच्याहस्ते करण्यात आले़ प्राचार्य अंजली पाटील, स्वाती सुरवाडे, ज्योस्त्ना महाशब्दे, भारती सोनवणे यांच्यासह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़