मुंबई । शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी तसेच अपंग मुलांसाठी नौदलाच्या वतीने बुधवारी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. लहानग्यांनी या विमानांच्या कॉक्पिटमध्ये बसून त्यांची माहिती जाणून घेतली. आयएनएस शिक्रा या नौदलाच्या तळावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रदर्शनात ‘चेतक’ आणि ‘सी किंग’, ‘सी हॉक’ या लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरच्या सामावेश होता. यावेळी चिमुकल्यांनी सेल्फी काढून आठवणी जतन केल्या. याप्रसंगी विद्यार्थिनींची संख्याही लक्षणीय होती. नौदलाच्या जवानांनी आवडीने मुलांना सर्व माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.