पिंपरी:रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले. विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी. विविध गाण्यांचा गजर.हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष.अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात मुलांनी दहीहंडीचा आनंद लुटला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते.