चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतला मार्केटींगचा अनुभव

0

 भुसावळ : शहरातील र.न. मेहता प्राथमिक विद्या मंदिरात बालआनंद मेळावा पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विक्रीचा अनुभव घेतला. या मेळाव्यास हिंदी सेवा मंडळ महामंत्री मधुलता शर्मा, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयाले, सदस्या आरती भारद्वाज, डॉ.जगदीश पाटील, प्राचार्या अंजना शर्मा, रिता शर्मा उपस्थित होते.

विविध क्रिडास्पर्धांमध्ये घेतला सहभाग
क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंतीचे औचित्य साधून लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत बालकांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला. तसेच खाद्यपदार्थ यांचे स्टॉल लावले. यामध्ये पाणीपुरी, भेळ, इडली, कटलेट, आईस्क्रिम, ङ्ग्रूटी, स्नॅक्स यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरच्या दृष्टीने वस्तूंची विक्री करण्याचा अनुभव असावा याकरीता या बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध खाद्यपदार्थांची विक्री करुन विक्री कार्याचा अनुभव घेतला. मान्यवरांनी स्टॉलला भेट देवून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला व बालकांचे कौतुक केले. शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण यांनी सावित्रीबाईंचा आदर्श रूजण्याची गरज असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन शीतल इंगळे यांनी केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. बालआंनद मेळाव्याचा आनंद घेतांना संस्था पदाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी सहभाग घेतला.