भुसावळ। पोदार जम्बो किड्समध्ये नुकतेच ‘लर्निंग जर्नी एक्झिबिशन’ भरवण्यात आले. सिनिअर केजी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांच्यातील विविध गुणांना वाव मिळावा, म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केले. तसेच प्रदर्शनाला पालकांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. मुख्याध्यापिका मनीषा श्रृंगी, प्राचार्य विनयकुमार उपाध्याय यांनी सर्व प्रकल्पांची पाहणी केली. पालकांनी देखील मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दाद दिली. तसेच विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध प्रकल्पांवर पालकांनी अभिप्राय नोंदवले.