चिमुरड्यांनी भुलाबाई महोत्सवातून पारंपारिक उत्सव जतन करण्याचा दिला संदेश

0

जळगाव । केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमीच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यात 34 संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा जिल्हास्तरीय झाली असून तीन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होते. यंदा या महोत्सवाचे 16 वे वर्ष साजरे झाले. यात भुलाबाईच्या गाण्यांना अग्रक्रम देत सध्याच्या चालू घडामोडींवर समाजोपयोगी संदेशाची पेरणी महिलांनी केली. भुलाबाई महोत्सवाच्या माध्यमातून पारंपारिक उत्सवाचे जतन करण्याचे संदेश देण्यात आले. केशवस्मृती पासून प्रेरणा घेत हा महोत्साव आता धुळे आणि नाशिक शहरात सुद्धा घेण्यात येत आहे. रविवारी 17 रोजी सरदार वल्लभ पटेल लेवा भवन येथे भुलाबाई महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दुर्गाताई गावित, नयना पाटकर, ललित कला अकादमीचे प्रमुख पियुष रावळ, महोत्सवाच्या प्रमुख अनिता वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

यांनी केले परिक्षण
प्रीती झारे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रतिमा याज्ञिक यांनी प्रास्ताविक केले. समारोप प्रसंगी आयएमआर कॉलेजच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे, जळगावच्या सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रियंका बोकील आणि बालकल्याण समितीच्या सदस्य माया काळे आदी मान्यवर उपस्थित होते. अपर्णा महाशब्दे, मैथिली पवनीकर, तेजल भट, श्रावणी नाखरे, मानसी भट, उत्कर्षा कुरुंभट्टी, निवेदिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री कुलकर्णी, जस्मिन गाजरे, सुप्रिया श्रावघे, अपूर्वा वाणी, कविता दिक्षीत, मृदुला कुलकर्णी, अलका चव्हाण, संगिता चांदोरकर यांनी परिक्षण केले.

‘स्वाईन फ्लू लसीकरण’
सेवावस्ती विभागाच्या आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून ‘स्वाईन फ्लू लसीकरण’ करण्यात आले. यात एकूण 2700 महिलांनी याचा लाभ घेतला. सेवावस्ती विभाग प्रमुख डॉ. विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनात डॉ. मोहन भावसार यांनी सेवा दिली.

यांनी घेतले परिश्रम
भुलाबाई महोत्सव यशस्वी होण्यासाठी समित्यांची स्थापना करण्यात आली होती. त्यात महोत्सव प्रमुख अनिता वाणी, प्रतिमा याज्ञिक, पियुष रावळ, नितीन नेमाडे, माधुरी जहांगीरदार, प्रीती महाजन, संगीता अट्रावलकर, वैशाली पाटील, सविता कानडे, साधना राजे, ज्योती रायपुरे, मंजुषा पवनीकर, भाग्यश्री कोळी, अपर्णा महाशब्दे, शैलेजा पप्पू, रेवती शेंदुर्णीकर, प्रांजली रस्से, मीनाताई जोशी, निवेदिता जोशी, प्रीती झारे, उत्कर्षा कुरुंभट्टी यांचा समावेश होता.