रत्नागिरी : माडबन परिसरातल्या चिरेखाणीत शनिवारी प्रशांत प्रकाश विचारेसह 3 पोलीस पोहायला गेले होते. त्यांच्यापैकी प्रशांत प्रकाश विचारे हे बुडाले होते व त्यांचा पुढे काही तासांच्या शोध कार्यात त्यांचा बुडालेल्या मृतदेह रविवारी पहाटे सापडला आहे. शोधमोहिमेत तटरक्षक दलाच्या स्कुबा चालकाने हा मृतदेह शोधून काढला. जिल्हा पोलीस मुख्यालयात शीघ्र कृती दलात सक्रिय असलेले विचारे हे उत्तमरीत्या पोहत असत, मात्र तरीही त्यांचा मृत्यु अशाप्रकारे झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. राजापूर तालुक्यातल्या माडबन परिसरातील चिरेखाणीमध्ये शनिवारी सायंकाळी प्रशांत प्रकाश विचारेसह 3 पोलीस पोहायला गेले होते. वर्षभराचे प्रशिक्षण संपल्यानंतर ते 2015 पासून जिल्हा मुख्यालयात कार्यरत होते. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने अनेकवेळा ते माडबन येथे बंदोबस्तासाठी जात असल्यामुळे त्यांना या परिसराची माहिती होती.