चिलारे येथे बिबट्याने केला तिघांवर हल्ला

0

शिरपूर । तालुक्यातील चिलारे या आदिवासी भागातील जगंलात बिबट्याने तिघांवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना 2 रोजी दुपारी घडली. दरम्यान तिघा जखमीना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. बिबट्याने हल्ला केल्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

अशी घडली घटना
तालुक्यातील चिलारे येथील जगंलात पोपट सुरसिंग पावरा (वय-27), हा गुरे चारत असंताना अचानक त्याच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. त्याने जोरजोरात आरोळ्या मारण्यास सुरवात केली. त्याचा आवाज ऐकून जवळ असलेल्या कालुसिंग महारु पावरा (वय-42) व महेंद्र जतन पावरा (वय-30) या दोघांनी घटनास्थळी धाव घेवुन काठीने बिबट्याला हाकलण्यास सुरवात केली. त्यावेळी बिबट्याने त्या दोघांवर जोरदार हल्ला चढविला. यात ते तिघेही गंभीर जखमी झालेत. त्यांना प्रथम येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आहे. बिबट्याकडून हल्ला होण्याची ही शिरपूर तालुक्यातील पहिलीच घटना असल्यामुळे नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.