जोहान्सबर्ग । भारताने चिलीचा 1-0 असा पराभव करत महिला हॉकी लीग उपांत्य फेरीच्या लढतीत आगेकूच कायम राखली. प्रिती दुबेच्या एकमेव गोलाच्या जोरावर भारताने हा विजय मिळवत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतले स्थान निश्चित केले.
प्रितीने सामन्यातील 38 व्या मिनीटाला हा गोल करत भारताला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. याआधी भारताला द. आफ्रिकेने गोलशुन्य बरोबरीत रोखले होते. तर दुसर्या लढतीत अमेरिकेने भारताचा 4-1 असा फडशा पाडला होता.