मुंबई : ‘चीट इंडिया’ चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक आठवडा आधी या चित्रपटाचं शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
सेन्सॉर बोर्डनं या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला होता. या चित्रपटाचं शीर्षक दिशाभूल करणारं आहे असं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे. म्हणून चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला. आता या चित्रपटाचं नवं नाव ‘ व्हाय चीट इंडिया’ असं असणार आहे. हा चित्रपट १८ जानेवारीला रिलीज होणार आहे.