चीन वारंवार आपल्या नौसेनेची शक्ती ताडून पहाण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वी चीनने जगातील सर्वात ताकदवान पाणबुडी समुद्रात उतरवली, याआधी स्वदेशी बनावटीची युद्धनौका पाण्यात उतरवली होती आणि आता स्वदेशी बनावटीची मिसाईल डिस्ट्रोयर ही युद्धनौका पाण्यात उतरवली आहे. टाइप 055 क्लासमधील ही गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर दहा हजार वजनाची असून ही युद्धनौका शांघाईच्या समुद्रात उतरवण्यात आली आहे.
या युद्धनौकेतून जमिनीवरून हवेत मारा करता येऊ शकतो. मिसाईल, क्रूज मिसाईल, एन्टी शिप क्रूज मिसाइल आणि अॅन्टी सबमरीन मिसाइल इत्यादी या युद्धनौकेत ठेवता येऊ शकतात. चीनी प्रसारमाध्यमांनुसार ही युद्धनौका जमिनीवर लढाई करण्यासाठी अधिक परिणामकारक ठरू शकते. 2030 वर्षापर्यंत चीनच्या नौसेनेत किमान 415 युद्धनौका असतील, अमेरिकामध्ये 309 असतील. तर चीनमध्ये 99 पाणबुड्या असतील, त्यात चार विमानवाहक युद्धनौका असतील, 102 विध्वंसक युद्धनौका असतील. चीन पाकिस्तानसाठीही पाणबुडी बनवत आहे. ही पाणबुडी पाकिस्तानसाठी बनवण्यामागे आर्थिक कॉरिडोर हे मुख्य कारण आहे.