चीनच्या वस्तूंविरोधात आंदोलन

0

ठाणे : भारताच्या सीमेत सातत्याने घुसखारी करून भारतविरोधी कारवाया करणार्या चीनचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीप्रणीत महिलांची रणरागिणी शाखा, अन्य समविचारी संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्या वतीने जाहीर आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ, अंबरनाथ पूर्व येथे होणार असून शनिवार, 29 जुलै 2017, सायंकाळी 5.30 वाजता होणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी यांनी यावेळी दिली.