बीजिंग: चीनमध्ये भारतीय दुतावासाने आयोजित करण्यात आलेला प्रजासत्ताक दिन रद्द करण्यात आलेला आहे. चीनमध्ये कोरोन विषाणूच्या संसर्गामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. या विषाणूची लागण आतापर्यंत ८३० लोकांना झाली आहे. या विषाणूमुळे २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोन विषाणू संसर्ग हा भारतीयांसाठीही चिंतेचा विषय बनला आहे. याचे कारण म्हणजे, वुहान आणि आसपासच्या परिसरात ७०० भारतीय विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
कोरोना विषाणूमुळे न्युमोनिया झालेल्यांची संख्या ८३० इतकी आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये एकूण २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यां पैकी २४ जणांचा मृत्यू मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील आहेत. तर एकाचा मृत्यू उत्तर चीनमधील हेबेई येथे झाला आहे. तर, चीनमधील २० प्रांतीय भागांमध्ये एकूण १०७२ संशयित आढळले आहेत. ही माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे.
२५ जानेवारी या दिवशी दरवर्षी चीनी नववर्ष साजरे केले जाते. या दिवशी चीनी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या दिवसी सस्त्यावर मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन गाड्या, ट्रेन आणि विमानांसह विविध वाहतुकीची माध्यमे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या शहरांमध्ये कोट्यवधी नागरिक राहतात. हुबेई प्रांतात येणाऱ्या हुगांग, एझाओ, झिजियांग, क्विनजिआंग आणि वुहान या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चीनी अधिकाऱ्यांनी २३ जानेवारीला स्पष्ट केले आहे. कोरोना या विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे सरासरी वय ७३ वर्ष इतके आहे. मृतांमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ही ८९ वर्षांची आहे. तर, या विषाणूला बळी पडलेल्यांमध्ये सर्वात तरुण व्यक्ती ही ४८ वर्षांची आहे.