चीनमध्ये ‘अंधाधून’ची ‘अंधाधून’ कमाई !

0

नवी दिल्ली: अभिनेता आयुषमान खुराना, राधिका आपटे, तब्बूची मुख्य भूमिका असलेला ‘अंधाधून’ चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. २०१८मधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाने स्थान मिळवले होते. गेल्याच आठवड्यात तो चीनमध्ये ‘पिआनो प्लेअर’ या नावाने प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चीनच्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. विशेष म्हणजे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातील ‘अंधाधून’ची कमाई केली आहे. यापूर्वीही ‘बजरंगी भाईजान’, ‘हिंदी मीडिअम’ हे चित्रपट देखील चीनमध्ये चांगलेच हिट ठरले होते.

पहिल्या पाच दिवसात ‘अंधाधून’ने चीनमध्ये ९५. ३८ कोटींची कमाई केली होती. ऑक्टोबर २०१८ मध्ये भारतामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दोन आठवड्याची एकूण कमाई ही ४१.९० कोटी इतकी होती. मात्र चीनमध्ये हिच कमाई तिप्पट झाल्याची पहायला मिळली. ‘अंधाधून’या चित्रपटात आयुषमान खुरानासह राधिका आपटे, तब्बू मुख्य भूमिकेत आहेत. तसेत हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. चाहत्यांनी हा चित्रपट अक्षरश: उचलून धरला होता. चीनमध्ये प्रदर्शित झालेला हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट आहे.