चीनला नमविणार्‍या ब्लंका बॉट्स संघाचा सत्कार

0

भुसावळ। संत गाडगेबाबा अभियांत्रिकीतील ब्लंका बॉट्स संघ अमेरिका, रशिया, ब्राझील, चीन व यूरोपीय खंडातील रोबोटिक्स संघाविरुद्ध विजयी होणार्‍या विश्वविजेत्या ब्लंका बॉट्स संघाचा त्यांच्या पालकांसह महाविद्यालयात हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे. टी. अग्रवाल, उपाध्यक्ष व्ही. पी. ओगले, सचिव मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष एम. डी. तिवारी, सह मंत्री बिशनचंद अग्रवाल, पंकज संड, डॉ. रविकांत परदेशी, आरती भारद्वाज, नंदकुमार अग्रवाल, प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, डॉ. राहुल बारजिभे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

रशिया व अमेरिका येथेही भाग घेणार
चीनला तीनदा नमवून आत्मविश्वास वाढलेला होता म्हणून अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलँडला हरवणे सोपे बनले असे संघ प्रमुख अक्षय जोशी याने सांगितले. रोबोटिक्सच्या स्पर्धेत रशिया व अमेरिका येथे काही दिवसात संघ भाग घेणार आहे असेही त्याने सांगितले. अक्षय जोशी, विनय चौधरी, योगेश गाजरे, शुभम नेमाडे, अनिकेत किनगे, रवींद्र आभाळे, मोहित चौधरी, शुभम दुसाने, वीरेंद्रसिंह खंडाळे यांनी विश्वस्तरावर आयोजित रोबोटिक्स रोबोवार स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. महाविद्यालय नक्कीच यापुढेही मोठ्या प्रमाणावर मदत करेल असे जे. टी. अग्रवाल यांनी आश्वासन दिले. इंडस्ट्रियल रोबोटिक्सच्या दुनियेत आता भुसावळातील तंत्रज्ञान वापरले जाईल यासाठीच्या उपाय योजना आखण्यासाठी महाविद्यालयिन मल्टी डिसीप्लेनरी समिती काम करेल असे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी सांगितले आहे.