चीनला सोडचिठ्ठी देणार्‍या सोडणार्‍या कंपन्यांना भारताकडे वळवा – नरेेंद्र मोदी

0

नवी दिल्ली – करोनाचा उगमस्थान ठरलेल्या चीनची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी व कोेंडी देखील होतांना दिसत आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी आपला चीनमधील गाशा गुंडाळणे सुरू केले आहे. अशा कंपन्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या चर्चेदरम्यान दिला.

चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर अनेक कंपन्या चीनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आपल्याला ठावूकच असेल. हे पाहता आपण जर योग्य असे धोरण आखले, तर ती गुंतवणूक आपल्या राज्यांमध्ये येऊ शकते असे मोदी बैठकीत म्हणाल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. भारतात चांगले मनुष्यबळ असून विकसित पायाभूत सुविधा देखील उपलब्ध आहेत. हे लक्षात घेता पर्यायी ठिकाण म्हणून राज्यांकडे चीनमधील कंपन्यांकडे आपल्याकडे वळवण्याची क्षमता आहे, असे मोदी बैठकीत म्हणाले.

करोनाची जीवघेणी साथ जगभरात फैलावण्यास चीनच कारणीभूत आहे असा आरोप सातत्याने करणार्‍या अमेरिकेने आता चीनकडून नुकसानीची भरपाई घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘आमच्या नुकसानीची चीनकडून आम्ही मजबूत वसुली करणार आहोत. मात्र, त्याचा अंतिम आकडा अद्याप ठरलेला नाही,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. जर्मनी चीनकडून १६५ अब्ज डॉलरची भरपाई मागणार असल्याचे तेथील एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.