काकामिगहरा (जपान) । बरोबर आठ वर्षांपूर्वी चीनने भारताला हरवून आशियाई महिला हॉकी चषक स्पर्धा जिंकली होती. आता पुन्हा दोन्ही संघ जपानमध्ये अंतिम सामन्यात समोरासमोर आले आहेत. याआधी स्पर्धेतील साखळी लढतींंध्ये भारताने चीनला हरवले असल्यामुळे या निर्णायक लढतीसाठी भारतीय खेळाडुंचे मनोबल उंचावलेले आहे. त्यामुळे साखळी लढतीतील विजयाची पुनरावृत्ती साधत आठ वर्षांपुर्वीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय खेळाडू मैदानात उतरतील हे निश्चित. साखळी लढतींमध्ये भारताची वाटचाल अपराजित होती. त्यानंतर बाद फेरींच्या लढतींमधील उपांत्यपुर्व फेरीत कझाकीस्तानचा आणि उपांत्य फेरीत गतविजेत्या जपानला हरवले होते. मार्गदर्शक हरेंद्रसिंग यांच्या भारतीय संघाने साखळी लढतीत सिंगापुरला 10-0, चीनला 4-1 आणि मलेशियाला 2-0 हरवले होते. याआधी 2009 मध्ये बँकॉकमध्ये दोन्ही संघ अंतिम फेरीत खेळले होते. त्यावेळी चीनने भारताचा 5-3 असा पराभव केला होता.
हिमतीवर स्थान मिळवायचेय
खरतर द.आफ्रिकेने आफ्रिकन नेशन्स स्पर्धेत घानावर मिळवलेल्या विजयानंतर भारताचे लंडनमध्ये पुढील वर्षी होणार्या विश्वचषक स्पर्धेसाधी स्थान निश्चित झाले होते. पण कर्णधा र राणी रामपालने आम्ही स्वत:च्या हिमतीवर विश्वचषक स्पर्धेत खेळू असे सांगितले होते. राणी म्हणाली की, आशिया चषक जिंकून विश्वचषक स्पर्धेमध्ये स्थान निश्चित करायचे आहे.आम्ही सगळे लक्श अंतिम सामन्यावर केंद्रित केले आहे. पुरुष संघाने आशियाई चषक जिंकल्यावर त्यातून प्रेरणा मिळाली. आता आमची पाळी आहे. अंतिम सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मागील स्पर्धेत, 2013 मध्ये कुललांम्पुरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत तिसर्या स्थानावर होता. भारताने एकदाच 2004 मध्ये, राजधानी दिल्लीमध्ये ही स्पर्धा जिंकली होती.