चीनसोबत युद्ध नव्हे, व्यापार होणार!

0

नवी दिल्ली| चीनची भारतात १६० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक आहे आणि भारतही चीनशी व्यापार संबंध वृद्धींगत करू इच्छित आहे, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय असू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

सुषमा स्वराज यांनी डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर, बदलत्या परिस्थितीत चीनशी संबंधांबाबत संसदेत प्रथमच केंद्राची भूमिका स्पष्ट केली. चीनशी मैत्री आणि चर्चेचा पर्याय जाहीर करताना पाकिस्तानशी मात्र चर्चा नाहीच, हेही त्यांनी सांगितले. आम्हाला मैत्री हवी आहे, मात्र हा विचार एकतर्फी असून चालत नाही. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाहीत, अशा शब्दात स्वराज यांनी काश्मिरबाबत सध्याचेच धोरण पुढे सुरु ठेवण्याचा इरादा जाहीर केला.

राहुल यांच्यावर टीका
डोकलाममधील स्थिती जाणून घेण्यासाठी भारतीय नेतृत्त्वासोबत चर्चा करण्याऐवजी विरोधकांनी चीनच्या राजदूतांसोबत चर्चा करण्याला प्राधान्य दिले, अशा शब्दात स्वराज यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.

दहशतवाद थांबवा, मग चर्चा
जोपर्यंत काश्मीरमधील दहशतवादी कारवाया थांबत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा होऊच शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण काश्मीर भारताचे आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्याची जबाबदारी झटकून टाकता आली नाही. पाकिस्तानच्या भूमिकेत आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळेच असे पहिल्यांदा घडले, असे स्वराज यांनी सांगितले.

कोणताही प्रश्न हा संवादानेच सुटतो, युद्धाने नव्हे. सुटत नाही. डोकलाम वाद वाटाघाटींच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आहे. चीनसोबत चर्चा सुरु आहे. याबाबत चर्चेनेच मार्ग काढता येऊ शकतो.
-सुषमा स्वराज 

पाकीस्तानासंदार्भात ….
आम्हाला मैत्री हवी आहे. मात्र, त्यासाठीचा रस्ता एकमार्गी असू शकत नाही!