जळगाव। चीन सैन्यांच्या भारताविरोधी कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी चीनी वस्तू विक्री करू नका असे आवाहन विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले होते. या आवाहनानुसार चिनी राखी विक्रीला न ठेवण्याच्या निर्णयाबद्दल फुले मार्केटमधील व्यापारी घेतला. व्यापार्यांनी अशा निर्णय घेतल्याने फुले मार्केेट मधील राखी व्यापारी अभिषेक जैन यांचा प्रतीकात्मक सत्कार करताना विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला. याप्रसंगी रमाकांत पाटील, संजुमामा जोशी, संजय पाटील, जितेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
भारत-चिनमधील युद्धसदृश परिस्थिती व द्विपक्षिय तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी राख्या विक्रीला न ठेवण्याचा निर्णय शहरातील अनेक व्यापारी तसेच विक्रेत्यांनी घेतलेला आहे. आंदोलनाचाच एक भाग म्हणून व्यापार्यांसह बैठका, पथनाट्ये, ऑटोरिक्षांतून स्टिकर्स, पोस्टर्स, पत्रक वाटप असा धडक कार्यक्रम मंडळाकडून सुरू आहे. मंडळाच्या आंदोलनाने प्रभावित होऊन व देशप्रेम व्यक्त करण्याची एक संधी घेऊन आपण मोठ्या नफ्याचा मोह बाजूला सारला आणि चिनी राख्या न विकण्याचा निर्णय घेतला, असे अभिषेक जैन यांनी सांगितले. आपापल्या बंधूंचे औक्षण करताना देशाच्या सीमेचे रक्षण करणार्या सैनिकांशी असलेल्या बंधुत्वाचा धागा तुटता कामा नये, याचे भान भगिनींनीही ठेवावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांनी केले आहे.