चीनी मालावर बहिष्कारासाठी पथनाट्यातून जनजागृती

0

जळगाव। डोकलाम सीमा प्रश्‍नावरुन भारत आणि चीन यांच्यातील संबंधतात बेबनाव दिसून येत आहे. चीनच्या कुरपत्यांमुळे वितुष्ट आणखी वाढतच आहे. चीन उत्पादीत उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात भारतात विक्री होते व यातुन मिळालेल्या पैसा चीन पाकिस्तानला पुरवते यातुन दहशतवादी कारवायांना चालना मिळत असल्याचे सध्या बोलले जात आहे. यासाठी चीनी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. विविधी सामाजिक संघटना, शाळा महाविद्यालये, सोशल मिडीया यांच्यामाध्यमातून चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी 12 रोजी शहरातील घनःश्याम नगर स्थित मानव सेवा मंडळ संचलीत शिशु विकास केंद्र प्राथमिक व माध्यमिक शाळेतर्फे शहरात पथनाट्याच्या माध्यमातून चीनी वस्तुवर बहिष्कार घालण्याची आवश्यकता असल्याचे सांगत स्वदेशी वस्तुंचा स्विकार करण्याचे आवाहन करण्यात आले.

पथनाट्यातून दिली चिनच्या कुरघोडींची माहिती
पथनाट्याच्या माध्यमातून चीनच्या कारवाया विषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी चीनचे आगामी धोरणाविषयी सांगितले. गणेशात्सव येत असून गणेशमुर्ती पासून तर सजावटीच्या साहित्यापर्यत सर्व स्वदेशी वस्तुंची खरेदी करा त्यातुन देशाविषयीचा प्रेम दाखविण्याची संधी असल्याचेही विद्यार्थ्यांनी पथनाट्यातुन सांगितले. भारतात चीनी वस्तुंवर बहिष्कार सुरु असल्याचे चीनला धडकी भरली असून चीनच्या वस्तुंवर आता मेड इन चायना असे लिहीलेले नसते तर मेड इन पीआरसी असे लिहीलेले असते या विषयी माहिती दिली.

वस्तुची निर्मिती तपासा
वस्तु खरेदी करतांना निर्मिती तपासून घ्या असेही विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून सांगितले. शहरातील चौका-चौकात, शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. महाविद्यालयीन तरुणांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून चीनी वस्तुवर बहिष्कार टाकण्याविषयी जनजागृती करा असे आवाहन त्यांनी केले आहे तसेच बाजारपेठांमध्ये चीनी वस्तुंचा अधिक खप होत असल्याने देशातील रोजगारावर गदा येत असल्याचेही निदर्शनात आणुन देण्याचे काम पथनाट्याद्वारे होत आहे. तसेच चिनी वस्तु खरेदी न करात भारतीय वस्तुंना मोठ्या प्रमाणात महत्व देवून त्यांची खरेदी करावी असा सदेश देण्यात आले.