धुळे । स्वदेशी वस्तुंचा वापर करा असे आवाहन स्वदेशी जागरण मंच तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधी राष्ट्रीय स्वदेशी अभियान राबवीत असून सदर अभियानाची माहिती यावेळी देण्यात आली. तरी धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकून तसेच चीनी वस्तु खरेदी – विक्री करू नये यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती देण्यात आली.
अभियानात समविचारी संघटना यांना सोबत घेवून कोपरा सभा,व्याख्याने, प्रतिज्ञा,पत्रके वाटप,बैठका, तसेच शाळा, महाविद्यालयीन तरुण -तरुणी,महिला भगिनी,युवक,व्यापारी बांधव,विविध समाजिक कार्यकर्ते यांच्या सोबत जनसंदेश देण्याचे काम स्वदेशी जागरण मंचातर्फे केले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली. यावेळी प्रा.सागर चौधरी, साहेबचंद जैन, प्रशांत मोरणकर, महेंद्र विसपुते, विवेक वावदे, सुरेंद्रजी काकड़े, हिरामण आप्पा गवळी, सचिन शेवतकर, किशोरजी सूर्यवंशी, अनिरुद्ध जोशी, आदी उपस्थित होते.