जळगाव। गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोशिएशने यापुढे चायना कंपनीचे मोबाईल व सामानविक्री करणार नाही असा संकल्प केला. या संकल्पाअंतर्गत विवो व ओप्पो कंपनीचे चे बोर्ड उतरवले आहेत. व्यापारी महामंडळच्या कार्यालयात चीनी वस्तूंवरील बहिष्काराबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी, पुरूषोत्तम टावरी आदी उपस्थित होते.
पैशाचा देशाविरोधात वापर
कैलास सोनवणे यांनी चीनी वस्तू विक्री न करण्याचे आवाहन केले. तसेच विवो व ओप्पो या कंपन्या चीनी असून यांचे मुख्य कार्यालय चीनमध्ये असल्याची माहिती दिली. या कंपन्याचे भारतात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय असून त्याचा ब्रँच मॅनेजर हा चिनी असल्याचा दावा केला. यातून पैसा आपला रोजगार त्यांना असे घडत असल्याचे स्पष्ट कले.
चीनी वस्तूंवर बहिष्कार
याप्रसंगी कैलास सोनवणे यांनी चीनने देशाच्या सीमेत घुसखोरी केली आहे. पवित्र कैलास मानसरोवर यात्रा थांबविली आहे. नुकतेच काश्मीरमध्ये सैन घुसविण्याची धमकी दिली आहे. आपल्याच देशातुन पैसा घेवून आपल्याच सैनिकां विरोधात चीन वापरत असल्याने व्यापार्यांनी चीनी वस्तुंची विक्री करू नये असे आवाहन त्यांनी केले. मी सैन्यात जावू शकलो नाही त्यामुळे सीमेवर चीनी सैन्याशी लढू शकत नाही. मात्र चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकून चीनशी लढणार आहे असे सांगितले.
आंदोलनाचे व्यापकता वाढविणार
बैठकीत उपस्थित व्यापार्यांचे शंका निरसरन करण्यात आले. चीनी मोबाईलचा माल लवकर संपवून नवीन माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. चायना केवळ मोबाईलपुरते मर्यादित नसून अनेक गोष्टी चायनाच्या वापरल्या जात असल्याने, अन्य व्यापार्यांमध्ये देखील जनजागृती करण्यात यावी असे सुचविण्यात आले. लवकरच डॉक्टर, प्लास्टीक व्यापारी, फर्निचर व अन्य व्यापार्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे नगरसेवक सोनवणे यांनी सांगीतले.