चुंचाळेत उसाला आग; साडेतीन लाखांचे नुकसान

0
 भुसावळ – यावल तालुक्यातील चुंचाळे शिवारातील शेतकरी मिलिंद मधुकर नेहेते (55, दहिगाव) यांच्या गट नंबर 298 अ मधील तीन बिघे शेताला शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आग लागलयाने ऊस व ठिबक नळ्या जळून खाक झाल्या. या घटनेत साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. नेहेते यांच्या तक्रारीनुसार यावल पोलिसात आगीची नोंद करण्यात आली. तपास हवालदार गफूर शेख करीत आहेत.