चुंचाळेत लोकसहभागातून नदी खोलीकरणाला सुरुवात

0

ग्रामस्थ सरसावले : चुंचाळ्यातील काही दात्यांकडून वर्गणी

यावल- गावो-गावात सुरू असलेली नदी, नाल्यांची स्वच्छता व त्या संदर्भात सोशल मिडीयातून होणारे समाज प्रबोधन पाहता ही प्रेरणा घेवून तालुक्यातील चुंचाळे ग्रामस्थांनी नजीकच्या गावातील ग्रामस्थांची मदत घेत नदी खोलीकरणाला सुरुवात केली आहे. गावनदी, डबकी नदीच्या गाव परीसरातील पात्र समतल करणे, नांगरणे आदी कामांना प्रारंभ झाला आहे.

अनेक दात्यांनी केली मदत
या प्रसंगी चुंचाळेकरांचे ग्रामदैवत श्री समर्थ सुकनाथ बाबा मंदिरात प्रगतशील शेतकरी सुनील बाळकृष्ण नेवे यांच्या हस्ते नारळ फोडून व ट्रॅक्टरचे पूजन करून अभियानाच्या शुभारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते संजय काशीनाथ पाटील यांनी त्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर नदीपात्र नांगरणीकरीता मोफत उपलब्ध करून दिले. नदी पात्रातील प्रथम काटेरी झुडूपे काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील बाळकृष्ण नेवे, संजय काशिनाथ पाटील, कैलास भास्कर धनगर, पंचायत समिती सदस्य दीपक नामदेव पाटील (मनवेल), किरण लिलाधर पाटील, किरण प्रल्हाद तेली, डिगंबर भाऊलाल पाटील, नितीन लिलाधर पाटील, देविदास रामसिंग राजपुत, गणेश ठाकुरदास चौधरी, विठ्ठल संतोष राजपुत, प्रकाश रामदास चौधरी, योगेश नथ्थू पाटील, मधुकर बारकु पाटी, लोटू शिवराम धनगर, चेतन जिजाबराव पाटील, संदीप ज्ञानेश्वर पंडीत, राजु वसंत धनगर आदींनी मदत केली. दरम्यान, भोनक नदीला ’पुर्नवैभव’ प्राप्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.